Friday, February 18, 2022

खंडोबा नगर येथील रस्ते व भूयारी गटार योजनेचे काम त्वरित पूर्ण करा.मुख्याधिकारी यांना निवेदन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गणेशपार भागातील खंडोबा नगर येथील रस्त्याचे काम व भूयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे.त्यामूळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसे अर्धवट नाल्यांवर ढापे टाकण्यात यावेत या साठी आज नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी मनसे पर्यावरण सेना राज्य चिटणीस तथा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, कासांडे सर,कुलकर्णी सर,सप्तर्षी सर,पांडूदेवा जोशी,यादव सर,सोहम मोगरकर,ऋषिकेश बारगजे,ऋषिकेश सारडा,केदार आंधळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment