परळी वैजनाथ ;- परळी येथील कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांना रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघ (वाकोडी ) अकोले च्या वतिने देण्यात येणारा यावर्षीचा दामिनी पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघ गेल्या तीन वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रातील पत्रकारांच्या कार्याचा सर्वे करून या पुरस्काराची निवड करत असते यावेळी या पुरस्कारासाठी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांची निवड केली आहे
गेल्या आठ वर्षापासून निर्भिड नि;पक्ष पत्रकारीता व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ.वर्षा मगर यांच्या कार्याची दखल घेत रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघाने त्यांची निवड केली आहे.
सौ.वर्षा हनुमंत मगर यांना यापुर्वी ही जिजाऊ रत्न पुरस्कार शिवप्रेरणा पुरस्कार , सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार मिळालेले आहेत.पत्रकारीतेतील विशेष कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन 6 जानेवारी रोजी दर्पण दिनी विशेष कार्यक्रमात विशेष मान्यवरांच्या हास्ते सन्मानीत करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतिने सांगण्यात आले.
ताई साहेब मन पूर्वक अंभिनदन
ReplyDeleteअभिनंदन ताई साहेब 👏💐
ReplyDeleteअभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🙏
ReplyDelete