* परळीकरांनी स्वयंशिस्त पाळावी-पोलीस उप अधिक्षक राहूल धस
परळी वैजनाथ ; कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हयात विविध उपाययोजना आखत आहे.परवा परळी शहरात संचारबंदी दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षाकांकडुन विषेश खबरदारीचा उपाय म्हणुन परळी शहरात विशेष राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. आज सकाळी 10 वाजता पोलीस उप अधिक्षक राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या जवानांनी शहरातील प्रत्येक प्रमुख रस्ते, वस्तीत संचलन केले. यामुळे नागरिकांत प्रचंड प्रमाणात जनजागृती झालेली दिसुन आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांनी पञकारांशी बोलतांना सांगितले की, संभाजी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक तर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन विभाग निर्माण केले आहेत. शहरात काही प्रमुख ठिकाणी नियोजन पाॕंईट असणार आहेत तर काही पोलिस कर्मचारी शहरात पेट्रोलिंगसाठी नियुक्त केले आहेत. परळीच्या नागरिकांनी लाॕकडाऊनचे नियम पाळुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ही राहुल धस यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment