* शासनाचे नियम पाळा, दंड टाळा.
परळी वैजनाथ दि. 15..
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४(१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. सार्वजनिक स्थळी धुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे असल्याने याबाबीचे पालन व्हावे याकरीता गैरकृत्य करणाऱ्या व्यक्ती विरुध्द जवळजवळ 50 जणांवर कार्यवाही करण्यात आली.
परळीत उघडे तोंड घेऊन फिरणा-यावर दंडात्मक कार्यवाही बाबत शासनाचे नियम पाळा, दंड टाळा असे आवाहन कैले होते.परंतु आता परळी नगर परिषदेने मास्क न वापरणा-या व सोशल डिस्टंस् न पाळणा-या विरुध्द उचले कडक पाऊल उचलले आहे.
नागरिकांनी शासनाचे नियम पाळून होणारा दंड टाळावा आणि सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले होते.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आॅन दी स्पाॅट कारवाई करण्यात आली.यासाठी प्रशासनाने भरारी पथकाची स्थापना केली असुन तोड उघडे घेऊन फिरणा-यावर 500 रुपये पावती अशी दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, पो. काॅ. मुजमुले, टाकरस, नगर परिषदेचे दत्तात्रय देशमुख, शेख जमील शेख हुसेन, अजयकुमार कलंत्री, दिलिप गुट्टे आदींसह एक फोटो ग्राफर यांनी हि धडक मोहिम राबविली.
No comments:
Post a Comment