बीड, दि. २९: जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सुट देण्यात आलेली आहे आणि भविष्यात सुट देण्यात येईल अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना पास सध्या चालू असलेल्या covid१९.mahapolice.in या वेबसाईटच्या आधारे घेता येतात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
परंतु सदरील संकेतस्थळावर अर्ज करतांना संबधित शासकीय नियंत्रण अधिकाऱ्याचे लेखी शिफारस असणे आवश्यक आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी याच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील बँकेमध्ये याप्रमाणे पास उपलब्ध असलेल्या व्यक्तींना देखील विषम तारखेस सकाळी ०७.०० ते सकाळी ०९.३० या वेळेतच बँकेशी संबंधित कामाला मुभा दिली जाते. या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही सोई-सुविधा पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना देखील देण्यात येत नाही.
जिल्ह्यतील सर्व बँकांनी याप्रमाणे पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बँकेच्या सर्व सोई-सुविधा या संचारबंदी काळातही बँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलबध करून द्याव्यात. या आदेशासह यापूर्वीचे सुधारीत आदेश, सुधारणा आदेश अमंलात राहतील असे निर्देश दिले आहेत.
No comments:
Post a Comment