परळी वैजनाथ ;- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोख-ण्यासाठी जमावबंदीसह संचारबंदी लागू केली गेलेली असतानाही परळी शहरातील काही सडकफिरे गल्ली बोळात संचारबंदीचं उल्लंघन करत कोरोनाला आमंत्रण देत असल्याने अशा सडकफिन्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आजपासून शहरातील गल्लीबोळात तसेच रस्त्यावर फिरणान्यांवर ड्रोनने नजर ठेवण्यात येणार आहे.
संचारबंदीच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे वारंवार सांगितले जात असताना परळीमधील काही सडकफिरे सातत्याने रस्त्यावर दिसून येतात.संचारबंदीसह जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करतात. अशा लोकांना पोलिसांनी विनंती केली व काठ्यांचा प्रतिसाद दिला आहे परंतु आता हे सडकफिरे चोर-पोलिसचा खेळ रंगवत असल्यामुळे अशा सडकफिन्यांना अद्दल घडवण्यासाठी आजपासून परळी शहरात ड्रोन कॅमेन्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. संचारबंदी काळात रस्त्यावर दिसून आलेल्या आणि ड्रोनने टिपलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे.दरम्यान आज परळी शहरातील प्रमुख रस्त्यावरची व ग्रामीण भागातही ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली याची ट्रायल आज घेण्यात आली.
No comments:
Post a Comment