Thursday, April 30, 2020

लॉकडाऊनच्या कालावधीत कापुस खरेदीस परवानगी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

* कोरोना विषाणुचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स पाळून एका दिवसात ५० वाहनांना परवानगी.

बीड(दि.३०)- शासकीय कापूस खरेदीचा अतिरीक्त ताण कमी करून नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतक-याचे कापसाची मोजमाप होऊन खरेदी होण्यासाठी एका दिवशी बाजार समितीच्या क्षमतेप्रमाणे तसेच जिनींग प्रेसिंगचे क्षेत्र विचारात घेवून कोरोना विषाणुचे संक्रमन टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स पाळून एका दिवसात ५० वाहनांना परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कापुस खरेदी संदर्भात जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतक-यांची संख्या व बीड जिल्ह्यात एफ ए क्यू दर्जाचा आणि एफ ए क्यू दर्जा पेक्षा खालच्या दर्जाच्या कापसाचे परिमाण पहाता जिल्ह्यातील सर्व सीबीआय महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ यांना कापुस खरेदीसाठी वेळ वाढवून देणे , एका दिवसात २० पेक्षा जास्य वाहनांना परवानगी देणे व जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालक यांनी शेतक-याकडील एफ ए क्यू व नाॅन एफ ए क्यू दर्जाचा कापुस खरेदीस परवानगी देण्याची आवश्यकता होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशा नुसार मानक कार्यप्रणाली ( एसओपी) चे पालन करण्याच्या अटीवर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्या सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म. व कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांच्या व्दारे खरेदी केल्या जाणा-या केंद्रावर दि.१३ मार्च २०२० पर्यंत बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या कापसाची खरेदी सकाळी१०:३० ते १:३० यावेळेत २५ वाहने व दुपारी २ ते ५:३० यावेळेत २५वाहने कापुस खरेदीस परवानगी देण्यात येत आहे.
या अटींवर कापुस खरेदी केंद्रावर किंवा कोनत्याही जिनींग फॅक्ट्रीमधे ज्या दिवशी शासकीय ग्रेडर उपलब्ध नाहीत तेथे प्राथमिक नोंदणी केलेल्या व प्राथमिक नोंदणी न केलेल्या एफ ए क्यू व नाॅन एफ ए क्यू ( FAQ व NON FAQ) दर्जाच्या कापसाची खरेदी करण्यास जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालक यांना वरील वेळेत व निर्देशानूसार कापुस खरेदीस परवानगी दिली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी शर्तीस अधीन राहून महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादन पणन महासंघ म.मुंबई कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व खाजगी जिनींग प्रेसींग फॅक्ट्री चालक यांना कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित खरेदी केंद्रावर शासकीय खरेदी असो किंवा नसो त्या केंद्रावर जिनींग , प्रेसिंग फॅक्ट्री चालक ,खाजगी खरेदीदार यांना शेतक-याकडील कापुस खरेदीस परवानगी दिल्याने शेतक-याचा कापसाचे मोजमाप होवून शेतक-याची त्यांना कापसाचे नगदी पेमेंट मिळेल.
प्रधान सचिव ( पणन) सहकार पणन व वस्रोद्योग विभाग मंञालय मुंबई यांनी सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म.मुंबई यांनी कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची तसेच खाजगी खरेदीदारांना कापुस खरेदी करण्याची परवानगी देण्याबाबत कळविले आहे.
या प्रमाणे कापुस खरेदी करतांना या कार्यालयाचे आदेश दि.२० एप्रिल २०२० मधिल इतर अटी व शर्ती कायम असून , सद्यस्थितीत शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड -१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि१४/३/२०२० पासुन लागू करुन खंड २,३,४मधिल तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. त्यांचे तंतोतंत पालन सर्व संबंधितांनी करणे बंधनकारक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment