Monday, April 13, 2020

भीमजयंती घरातच साजरी करून कोरोनावर मात करा.हेच खरे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन-;सौ.वर्षा मगर


परळी वैजनाथ  : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व बौद्ध अनुयायांनी घरीच साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे व कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करावी असे आवाहन जय महाराष्ट्र महिला संघटना अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर  यांनी केले आहे 
सर्व दिन दलित समाजाचे उधारकर्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व  बौद्ध धर्मियांच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे .देशभर 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात हा जयंती सोहळा साजरा केला जातो.या निमित्ताने समाजातील प्रत्येक लहान थोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध विहारात , पुतळा परिसरात मिरवणुकीत सहभागी होत असतात , 18 तास अभ्यास उपक्रम, सामूहिक बुद्ध वंदना आयोजित केली जाते . पण  यंदा कोरोना विषाणूच्या हाहाकाराने संपूर्ण जग हादरून गेले असल्यामुळे  भीम जयंती सोहळा नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करू नये तर आपल्या घरात राहूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे  नम्र आवाहन जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर  यांनी  जनतेस केले आहे.  सध्या जमाव बंदी आदेश आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत सर्व समाजबांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment