* परळी शहर पोलिसांची मोठी कार्यवाही .
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर पोलिसांनी अंबाजोगाई रोडवरील सपना हाॅटेलमधुन होणारी चोरटी दारू विक्री उघडकीस आणली आहे. दारू विक्री करणारे दोघेजण ताब्यात घेतले असुन एक लाख सहा हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान संचारबंदी लागू असुनही शहरात सर्रास चोरून दारू विक्री सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबाजोगाई रोडवरील सपना हाॅटेलमधुन विदेशी दारूची चोरून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे, पोलीस जमादार बांगर, पोलीस शिपाई मुंडे, केंद्रे, भताने, बुड्डे यांनी आज दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता हाॅटेलवर धाड टाकली. यावेळी समोरून सिल असताना पाठीमागून विदेशी दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी सुनील चंद्रकांत देवरे, रा. बँक काॅलनी, सुरेश बाबुराव वाघमारे रा. शंकर पार्वती नगर हे दोघे दारू विकताना आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख सहा हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment