Wednesday, April 8, 2020

बीडच्या आष्टी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

* बीड जिल्ह्याची काळजी  वाढली

बीड ;- बीडमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला, नगरच्या तब्लिगी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला हा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला , या रुग्णाचा संचार हा नगर जिल्ह्यात राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा बीड जिल्ह्यात त्याच्या मूळ गावी आला होता, कोरोना बाधिताला नगरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणू लागन झालेला रुग्ण आढळुन आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात इतञ कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973चे कलम 144 नुसार आष्टी तालुक्यातील पिंपळा या गावापासुन 3कि.मी.परिसरातील पिंपळगाव,धनगरवाडी,काकडवाडी ठोबळसांगवी व खरडगव्हाण हा परिसर containment zone म्हणुन घोषीत करण्यात आले आहेत. Containment zone नंतर पुढील 4कि.मी. परिसरातील लोणी नांदुर,सोलापुरवाडी,खुंटेफळ,कोपाळ हि गावे buffer zone म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment