Friday, April 3, 2020

गोरगरीबांची उपासमारी थांबविण्यासाठी मोफत धान्य त्वरित वाटप करा― प्रा.टी. पी.मुंडे

परळी/प्रतिनिधी... दि 03 एप्रिल
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे रोजंदारी करणाऱ्या व हातावर पोट असलेल्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे ती थांबविण्यासाठी मोफत धान्य त्वरित वाटप  करावे अशी मागणी लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी मुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.
    कोरोना वायरस च्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. याचा सर्वात जास्त फटका रोजंदारी करणारे मजूर गोरगरीब जनतेला बसत आहे. अशा सर्व गरजुवंतांना 3 महिने मोफत धान्य देण्याची घोषणा सरकारने केली परंतु अद्याप धान्य वाटप झाले नाही
    गोरगरीब जनता व रोजंदारी करणारे मजूर सरकारच्या लॉक डाऊन च्या आदेशाचे पालन करून घरातच आहेत उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्यावर व मुलां- बाळावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ ,एक लिटर खाद्य तेल ,दोन किलो साखर त्वरित वाटप करावी त्या आशयाचे आदेश जिल्हाधिकारी ,जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांना द्यावेत अशी मागणी लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केली आहे. नजीकच्या स्वस्त धान्य दुकानातूनच ही व्यवस्था करावी असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment