परळी प्रतिनिधी : कोरोना या भयंकर आजाराने देशभरात थैमान घातले आहे,राज्यात जवळपास 500 च्या वर कोरोना रुग्ण आढळलेले असतांना केंद्र व महाराष्ट्र शासनाने पूर्ण देशभरात कोरोनाचा फैलाव थांबवण्या साठी पूर्णतः लॉकडाऊन केलेले आहे त्या मुळे रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब व निराधार यांचे परिवार उघड्यावर आले आहेत.समाजात काम करत असतांना समाजाचे आपण काही देने लागतो या प्रांजळ भावनेतून मा ना पंकजाताई मुंडे व डॉ खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रेरणेतुन सामाजिक सलोखा राखत प्रभाग 13 चे नगरसेवक प्रा पवन मुंडे याच्या वतीने आपल्या प्रभागाप्रती संवेदना दाखवत सुमारे 200 निराधार,अपंग व विधवा कुटुंबाना शिधा देण्यात आले.
प्रभाग 13 मध्ये अनेक गरीब कुटुंब व निराधार लोक राहतात रोज काम केले तरच रात्रीचे दोन घास त्यांना खायला मिळतात या प्रसंगी सर्व सामान्य लोकांना आपल्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी असे शिधा च्या माध्यमातून किराणा समान देऊन छोटेसे योगदान देऊन आपण समाजातल्या प्रत्येक घटका प्रति कृतज्ञाता म्हणुन आपण हा उपक्रम राबवीत असून चांगली ऐपत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने व लोकप्रतिनिधी ने आज देश अडचणीत असतांना आपल्याला घडेल त्या पद्धतीने प्रत्येक वंचित घटकाला मदतीचे योगदान देणे गरजेचे असल्याचे भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी म्हटले आहे
सर्व सामान्य लोकांसाठी नेहमीच अग्रेसर व सुख-दुःखाच्या प्रसंगी जातीने लक्ष घालून काम करण्याच्या दृष्टीने लौकिक मिळवलेल्या नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या बद्दल प्रभागातील सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
* सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी साठी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी नामी शक्कल लढवली असून ज्या ठिकाणी गरजूना शिधा पोचवायची गरज आहे, तिथे "किराणा सामान ने भरलेली मोबाईल व्हॅन" तयार केली असून आवश्यक तेथे अनावश्यक गर्दी टाळून मुंडे हे स्वतः गाडी चालवत सामान पोचवत आहेत त्या मुळे सोशल डिस्टन्स राखत ते आपले काम पूर्णत्वास नेत आहेत.
No comments:
Post a Comment