* कोरोना लाॕकडाउन च्या पार्श्वभूमीवर समाज बांधवाचा निर्णय.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
सध्या सर्वत्रच कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव यावर्षी वीरशैव लिंगायत समाजाने घरच्या घरीच साजरा करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके यांनी केले आहे.
दरवर्षी परळी शहरासह देशभरात अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो. मात्र यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच समाज बांधवांनी अक्षय तृतीयेला म्हणजे 26 एप्रिल रोजी एकाच वेळी दुपारी बरोबर 12.01 वाजता आपापल्या घरासमोर रांगोळी काढून घरावर भगवा ध्वज उभारून गळयात रुमाल घालून आपल्या सर्व परिवारासह महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी. पुष्पहारासाठी घरी फुले उपलब्ध असल्यास तयार करा अन्यथा हार आणण्यासाठी बाहेर जाऊ नका, असेही सांगण्यात आले. समाज बांधवांनी सरकारच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके यांच्यासह शहराध्यक्ष नितीन समशेट्टे, तालुका सचिव विकास हालगे, वधू वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष शामभाऊ बुद्रे, माजी अध्यक्ष अश्विन मोगरकर, विकासअप्पा हालगे, माजी नगरसेवक रमेश चौंडे , नरेश पिंपळे सचिन स्वामी, दत्ता गोपनपाळे शिवकुमार चौंडे, प्रकाश खोत , अनिल चौंडे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment