परळी वैजनाथ;- राज्यात आणि देशात कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. राज्यात असणाऱ्या सर्व रक्तपेढ्यांत रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. शासन रक्तदात्यांना स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा असे आवाहन करीत आहे तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालय, अंबाजोगाई, उपजिल्हा रुग्णालय, परळी यांच्या सहकार्याने व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आणि आरोग्य मित्रच्या वतीने शुक्रवार, दि.०३ एप्रिल २०२० रोजी उपजिल्हा रूग्णालय, परळी वैजनाथ येथे सकाळी ९ वाजता प्रारंभ करून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात आणि देशात कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. राज्यात असणाऱ्या सर्व रक्तपेढ्यांत रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. शासन रक्तदात्यांना स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा असे आवाहन करीत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालय, अंबाजोगाई, उपजिल्हा रुग्णालय, परळी यांच्या सहकार्याने व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व आरोग्य मित्रच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात आपण, आपल्या संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, आपल्या कुटूंबातील सदस्य, मित्र परिवार यांना स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यास सांगावे. सामाजिक भावनेतून आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही म्हण सार्थ ठरवावी अस नम्र आवाहन .राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष,आरोग्य मित्र समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल मो.बियाणी यांनी केले आहे.
(नाव नोंदणी केलेल्या रक्तदात्यांना येण्या-जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात येईल)
No comments:
Post a Comment