Wednesday, April 1, 2020

उपविभागीय आधिकारी मा.गणेश महाडिक यांची जमाव बंदी चे उल्लंघन करणाऱ्या विटभट्टी चालकावर कारवाई.


परळी वैजनाथ ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लागु केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परळीतील तीन विटभट्टी चालकांवर उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी कारवाई करून तीन वाहनेही जप्त केले आहेत. याप्रकरणी तिघांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शासन विविध उपाय योजना करीत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा लवकर फैलाव होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे तर बीड  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही परळी परिसरात विटभट्ट्या चालू होत्या. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी थेट विटभट्टीवर जाऊन पाहणी केली.यावेळी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. 
खुदीन अब्दुल कादर मुल्लाजी यांच्या विटभट्टीवर पाण्याचे टँकर असल्याने ते जप्त केले तर संतोष गवते यांच्या विटभट्टीवर मजुरांच्या वाहतुकीसाठी अॅपे रिक्षा मिळून आला तो ताब्यात घेतला तर मुख्तार खाँ दाऊद खाँ पठाण यांच्या विटभट्टीवरील ट्रॅक्टर जप्त केले. उपरोक्त तिन्ही विटभट्टी चालकाविरुद्ध कालीदास पवार यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईवेळी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, परळीचे तलाठी जी. एन. राजुरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment