* फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली .
बीड ;-(प्रतिनीधी )पुरवठा विभागातील शासकीय गोदामांमधून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविल्या जाणार्या धान्यात भलतेच लोक साठमारी करतात आणि धान्य कमी देतात अशा तक्रारी होत्या. या तक्रारींचा भांडाफोड गुरुवारी स्वत: जिल्हाधिकार्यांनीच केला. बीडच्या शासकीय गोदामावर छापा मारत तब्बल पाच तासाहून अधिक वेळ जिल्हाधिकार्यांनी या गोदामाची झाडाझडती घेतली असून यात मापातील पाप उघड झाले असल्याचे कळते. यानंतर संबंधीत गोदामरक्षक शिवशंकर मुंडे विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याच्या हलचाली सुरु असून फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील प्रशासन विचार करत असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यात शासकीय धान्य गोदामात धान्याचा काळाबाजार हा नेहमीचा विषय आहे. शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करताना पोत्यातील माल कमी केला जातो आणि या धान्याची काळ्या बाजारात विल्हेवाट लावली जाते अशा तक्रारी या पूर्वी अनेकदा अनेक गोदामांच्या बाबतीत आल्या होत्या. बीडच्या धान्य गोदामाबाबत या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.
गुरुवारी या तक्रारींची दखल स्वत: जिल्हाधिकार्यांनीच घेतली. गुरुवारी दुपारी त्यांनी थेट बीडच्या शासकीय धान्य गोदामाला भेट दिली त्यावेळी एक वाहन स्वस्त धान्य दुकानाला धान्य पुरवठा करण्यासाठी जात होते. या वाहनामध्ये कागदोपत्री उल्लेख असलेल्या संखेपेक्षा तीन पोते कमी असल्याची बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी गोदामात जाऊन पोत्यांचे वजन करणे सुरु केल्यनांतर अधिकच धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
या संदर्भात रात्री उशीरा पर्यंत कारवाई सुरुच होती. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेतला आहे हे उशीरापर्यंत कळले नसले तरी सदरील गोदामरक्ष शिवशंकर मुंडे याच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असून त्या दृष्टीने कारवाई प्रस्तावित करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत देखील प्रशासन विचार करत असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
* कसे होते मापात पाप-*
बीडच्या गोदामात जो
वजनकाटा बसविण्यात आला होता मुळात त्या वजनकाट्यातच फेरफार करण्यात आली होती. तब्बल अर्धा किलोची तफावत या वजनकाट्यात करण्यात आली होती अशी माहिती आहे. जिल्हाधिकार्यांनी त्यानंतर वजनमापे निरीक्षकांना बोलावून नविनकाट्यावरुन वजन केल्यानंतर ही बाब समोर आली. या पाचशेग्रामच्या तफावतीसोबतच प्रत्येक पोत्यात एक ते दोन किलो दरम्यान धान्य कमी असल्याचे आढळून आले आहे. रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकारी बीडच्या गोदामात तळ ठोकून होते.
No comments:
Post a Comment