परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या मातोश्री सौ. इंदूबाई भास्करराव जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (दि. ०२ एप्रिल) निधन झाले. जोशी कुटुंबियांचे ना. मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, नेते, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वन केले.
सौ. इंदुबाई जोशी जोशी यांना काल गुरुवारी सायंकाळी ५.३० वा. देवाज्ञा झाली. कालच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे मोजके नातेवाईक व आप्तेष्ट उपस्थित होते.
ही दुखद बातमी समजताच जोशी कुटुंबियांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मुंबई येथील पत्रकार व अनेक हितचिंतकांनी फोनवरून सांत्वन केले आहे.परळी शहर व तालुक्यातील पत्रकार, विधिज्ञ, डॉक्टर, नगरसेवक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जोशी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
No comments:
Post a Comment