परळी वैजनाथ ;- परळी येथील औद्योगिक इंडस्ट्री एरियात कुलरच्या फॅक्टरीस  अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागली आहे.या आगीत वित्तहानी मोठी झाली असुन सुदैवाने जिवित हानी झाली नाही.
औद्योगिक इंडस्ट्रीत सुनिल सोळंके यांचे कुलर व इतर इलेक्ट्रॉनीक साहित्याच्या गोदामाला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली या आगीत कुलर व इतर साहित्य जळुन खाक झाली असुन लाखोचे नुकसान झाले आहे.दरम्यान नगर परिषद व थर्मलच्या
फायर ब्रिगेड च्या गाड्यांना पाचारण करुन आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.
या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून ही आग कोणत्या कारणाने लागली आहे हे अद्याप समजु शकले नाही.
हि आग इतकी भिषण आहे कि इतञ फैलावण्याची परिस्थिती निर्माण झाली असुन आगीला नियंत्रित करण्यासाठी अग्निशामक बंबा बरोबर स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहे.
घटना स्थळी पोलिस ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.