Thursday, December 24, 2020

उध्दवा ! अजब तुझे सरकार.. गरीब,शेतकरी,मत्स्यमार सोडून दारू विक्रेत्यांसाठी आधार !



 * मद्यविक्री शुल्कात सूट देण्याचा मंत्री मंडळात निर्णय.

मुंबई ;- (प्रतिनीधी) कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तीना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच २०२०-२१ वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली १५ टक्के वाढ मागे घेण्याचा ही निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगावर महामारीचे संकट कोसळले. आपल्या देशासह महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाला याच्या फार मोठ्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. शेतकरी, कष्टकरी,मत्स्यमार रस्त्यावर आला आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज असतानां महाविकास आघाडीचे सरकार भांडवलदारांसाठी मदत जाहीर करत आहे. ताळेबंदीच्या काळात राजरोसपणे दुप्पट किमतीला दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना आता सरकार मदत करणार आहे. सरकारच्या मदतीची खरी गरज शेतकरी, मत्स्यमारांच्या सहकारी संस्था सभासद यांना असतानां ठाकरे सरकार मद्य विक्रेत्यांना सुट देत आहे.

एफएल ३ अनुज्ञप्तीस ५० टक्केएफएल ४ अनुज्ञप्तीस ५० टक्केफॉर्म ई अनुज्ञप्तीस ३० टक्केफॉर्म ई २ अनुज्ञप्तीस ३० टक्के सूट देण्यात येत आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांनी नुतनीकरण शुल्काचा भरणा यापूर्वी केला आहे अशांना या सवलतीचा लाभ पुढील नुतनीकरणाच्या वेळी मिळेल.

वर्ष २०२० -२१ या ताडी वर्षाकरिता करण्यात आलेली ६ टक्के वाढही मागे घेण्यात येईल तसेच १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी अनुज्ञप्ती शुल्काच्या प्रमाणात ३ महिन्यांचे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येईल. ही सूट समायोजनाद्वारे देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष परतावा मिळणार नाही.

वरील सर्व मद्यविक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. ५ ऑक्टोबर पासून राज्यातील खाद्यगृहेव परमिट रूम्समधून आसन क्षमतेच्या  ५० टक्केच मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा  व्यवसाय ५० टक्केच होतो आहे. परमिट रूम्समध्ये त्यांच्याकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत सीलबंद विक्री करण्यास १९ मे पासून परवानगी दिली असली तरी ही परवानगी किरकोळ मद्य विक्री दुकानांमध्ये अतिरिक्त गर्दी होऊन नये म्हणून देण्यात आली होती. शिवाय घरपोच मद्य सेवा सुरु असल्याने या कालावधीत त्यांचाही व्यवसाय झालेला नाही. ताडी व्यावसायिकांचे व्यवसाय ५ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण बंद असल्याने १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील चार महिन्यांची शुल्क माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क हा राज्याच्या महसुली उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. २०१९-२०मध्ये १५ हजार ४२९ कोटी महसूल जमा झाला असून निव्वळ अबकारी अनुज्ञप्ती नुतनीकरण शुल्क ९०९.१० कोटी इतके होते.  देशात कोविड प्रादुर्भाव वाढल्याने २५ मार्चपासून देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे सर्व मद्यविक्री दुकाने बंद होती. ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. सध्या राज्यात ९७७ टीडी १ अनुज्ञप्त्या असून अन्य २८ हजार ४३५ मुख्य किंवा प्रधान अनुज्ञप्त्या आहेत.

No comments:

Post a Comment