परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांचे आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्ष वयाचे होते.गंगाधरअप्पा नावंदे यांच्यावर उद्या रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता परचुंडी ता.परळी येथे अंत्यविधी होईल.
परळी तालुक्यातील परचुंडी येथील रहिवाशी गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांचे आज शनिवारी दुःखद निधन झाले. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांचे ते जेष्ठ बंधू होत. गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन व दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांच्यावर उद्या रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता परचुंडी ता.परळी येथे अंत्यविधी होईल. नावंदे कुटूंबियांच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment