जालना :-(प्रतिनीधी ) जालन्यात पत्रकारांशी बोलताना मंत्री टोपे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तसाठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला लागलीच प्रतिसाद देत ”विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य” यांनी समितीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त राज्यात ठीक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.असे संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांनी सांगितले आहे.त्याचाच एक भाग म्हणून ”विश्वजन आरोग्य सेवा समिती धाराशिव जिल्हा” यांच्या वतीने परंडा तालुक्यातील देवगाव येथे दि.15 डिसेंबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी अनमोल असे रक्तदान करून एका गरजू व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment