
* मुंबई पोलिसांत खळबळ, आत्महत्येचे कारण गूलदस्त्यात.
मुंबई वार्ता :- (प्रतिनीधी) पोलिसांच्या जीवनांत कोणत्या वेळी काय वादळ निर्माण होईल किंव्हा वरिष्ठांच्या दबावतंत्राने केंव्हा त्यांचा मानसीक तोल जाईल याचा नेम नसतो अशीच एक मुंबईतील पोलिस विभागातून धक्कादायक बातमी समोर आली असून एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आपलं आयुष्य संपवलं आहे. सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉस्टेबल गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेने मुंबई पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteयाची गृहखात्यातर्फे सखोल चौकशी करून जर यात इतर कोणी दोशी असतील तर कठोर कारवाई करून योग्य पावले उचलली तर अशा घटनाना आळा बसेल.
ReplyDeleteयाची गृहखात्यातर्फे सखोल चौकशी करून जर यात इतर कोणी दोशी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व योग्य पावले उचलली तर अशा घटनाना आळा बसेल.
ReplyDeleteयाची गृहखात्यातर्फे सखोल चौकशी करून जर यात इतर कोणी दोशी असतील तर त्याच्यावर कारवाई करावी व कठोर पावले उचलावीत तर अशा घटनाना आळा बसेल.
ReplyDelete