Sunday, December 13, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात केक घेण्यासाठी लोकांची गर्दी.पोलिसांचा सौम्य लाठीमार.



परळी दि.१२ (प्रतिनीधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ८० किलो चा केक कापण्यात आला. कापलेला केक घेण्यासाठी परळकरांनी मोठी गर्दी केली होती.हा केक घेण्यासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ सुद्धा लागली होती. अवघ्या काही मिनिटात ८० किलो चा केक गायब झाला. केक घेण्यासाठीची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.या कार्यक्रमामध्ये हा केक घेेणंसाठी म्हणून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मोठी झुंबड उडाली होती.या गर्दीला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा केक बघण्यासाठी केक घेण्यासाठी म्हणून लोकांनी गर्दी केली होती. मात्र इथे कसल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स नव्हते आणि लोकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावलेले नव्हते. सामाजिक न्याय मंत्र्यांकडून कोरोनाच्या काळात अशी गर्दी जमवण कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेकडो लोकं स्टेजवर केक घेण्यासाठी जमले होते. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागले. पोलीस असताना देखील लोकांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. आणि हा केक घेण्यासाठी स्टेज वर गर्दी केली." 

No comments:

Post a Comment