मुंबई -राज्य सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी खर्च केल्याच्या बातमीचे खंडन करीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला आठ दिवसांपूर्वी बंगला ताब्यात भेटला आहे,अजून रहायला सुद्धा गेलो नाही,त्यामुळे अशा आधारहीन बातम्या चुकीच्या आहेत अशी माहिती मुंडे यांनी दिली .
राज्य सरकारने विविध मंत्र्यांच्या बंगल्यावर मोठखर्च केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी दिल्या,त्यामध्ये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी -१ कोटी ७८ लाख
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन – २ कोटी २६ लाख
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत – १ कोटी ४६ लाख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा चित्रकूट -३ कोटी ८९ लाख
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा शिवनेरी -१ कोटी ४४ लाख
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक – १ कोटी ६७ लाखच्च व तंत्रशिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा बी ३ – १ कोटी ४० लाख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा सातपुडा – १ कोटी ३३ लाख
नितीन राऊत यांचा पर्णकुटी – १ कोटी २२ लाख
एकनाथ शिंदे यांच्याकडील अग्रदूत आणि नंदनवन – २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे म्हटले होते .
याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बातम्या चुकीच्या असल्याचे सांगत आपल्याला आठ दिवसांपूर्वी बंगला भेटला आहे,त्यामुळे एवढा खर्च केल्याची माहिती चूक आहे असं स्पष्टकेले आहे .
No comments:
Post a Comment