लाखांदूर :सध्या तालुक्यातील अनेक रेती घाटावर रात्रोच्या वेळी रेती तस्करी होतांना दिसत आहे. जिल्ह्यासह आंतर जिल्ह्यात रेतीचा पुरवठा केला जात असल्याने लाखांदूर तहसीलदार यांनी रात्रीच्या वेळी फिरकी घालून टिप्परसह ट्रॅक्टर्सवर कारवाही केल्याचे दिसून आले आहे.त्याचबरोबर अवैध साठवणूक असलेल्या रेतीसाठ्यावर कारवाही केली आहे.
तालुक्यातील मध्यरात्रीच्या सुमारास टिप्परच्या सहाययने रेती वाहतूक सुरू असल्याचे माहिती होताच मालकावर ७१ हजार ६००रुपयांचा दंड थोटावला आहे.टिप्पर मालक दिनेश बाजीराव खोब्रागडे रा अर्जुनी मोरगाव असे नाव आहे.ही कारवाई दिघोरी/मोठी येथे करण्यात आली.गावालगत होत असल्याचे गावातील काही लोकांनी तहसीलदार यांना माहिती दिली.सदरच्या माहितीच्या आधारे तहसीलदार निवृत्ती उईके यांनी कारवाई केली.तर टिप्पर क्रमांक एम,एच,३५/ए आय ०८४१ सह टिप्पर पकडला.सदर घटना १० डिसेंबर रोजी घडली आहे.
तर काल दि.१२डिसेंबर रोजी दोन ट्रक्टर अवैध रेती वाहतूक करतांना आसोला रेतीघाटवर रेती चोरी करताना आढळले असता दोन्ही ट्रक्टर तहसीलदार उईके यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.ट्रक्टर क्रमांक स्वराज ८४३ गाडी क्रमांक एमएच ३६ झेड ९८४१ तर ट्राली क्रमांक एमएच ,३६ झेड ९९६३ दुसरा ट्रक्टर आयसर ३६८ गाडी क्रमांक एमएच ३६ यु ५७४८ अशी गाडीचे क्रमांक आढळून आले आहेत. या दोन्ही मालकाचे नाव अद्यापही कळले नसल्याने तहसीलदार यांनी माहिती देण्यास सोमवारी देऊ असे सांगितले आहे. तर नांदेड रेती घाटावर शेकडो ब्रास रेतीसाठा सापडला आहे. याची माहिती सर्कलचे रेव्हनी नागपुरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली आहे. यावर तातडीने सोमवारी कारवाही करणार असल्याचे सांगितले आहे. अनेक भागात रेती तस्करी होत असून लाखोंच्या महसूल रेती तस्कराच्या घस्यात जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
Wednesday, December 16, 2020
तहसीलदाराची अवैध रेती तस्करावर धडक कारवाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment