नेकनूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांजरसुंबा घाटात असलेल्या राधिका हॉटेलमध्ये जुगार खेळवला जात असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना कळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी १९ जण जुगार खेळताना आढळून आले तर तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना आणि नेकनूर पोलिसांनी केली.,
नेकनूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी जबाबदारी घेतल्यानंतर बालाघाटावर अवैध धंदे वाढल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून चांगल्याच वाढल्या होत्या.गोसावी आल्यापासून अवैध धंदे बोकाळल्याचे चित्र होते.त्यापार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांना राधिका हॉटेलमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार मीना व नेकनूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,पोलीस उपनिरीक्षक पानपाटील,पोलीस उपनिरीक्षक गटूवार,पोलीस अंमलदार चोपणे,श्री.मुंडे,इनामदार,श्री.वडने,श्री.क्षीरसागर,श्री सातपुते,श्री.राऊत,श्री.ढाकणे यांनी सापळा रचून राधिका हॉटेलवर छापा मारला.यावेळी हॉटेलमध्ये तिरट नावाचा जुगार खेळताना भगवान चंद्रकांत गरड,तात्यासाहेब अंबादास बहिर,अशोक सुधाकर घुले,अनिल ज्ञानोबा करडुले,सदाशिव उत्तम बिक्कड,अनंत शंकर शिनगारे,संदीप पिलाजी गोरे,जगदीश बाबासाहेब जगताप,संतोष अंबादास सोनावणे,किशोर अशोक मोराळे,तात्यासाहेब आत्माराम आमटे,प्रकाश रूपा राठोड,नितीन भगवान शिनगारे,जालिंदर भिवा त्रिमुखे,सुभम सुरेश चव्हाण,योगेश युवराज घुले,भीमा रामकिसन वाघमारे,रामा ज्ञानोबा भोसले,दशरथ राजाराम त्रिमुखे या १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या कारवाई तब्बल ३१ लाख ७४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटावरील ही कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे.
Friday, April 5, 2024
सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना आणि नेकनूर पोलिसांची कारवाई मांजर सुंबा घाटात १९ जुगार्यांसह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
0
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment