हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. आज देखील बीडच्या आष्टी तालुक्यातील भाळवणी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या राहत्या घरावरील छत कोसळले आहेत. तर पत्रे देखील उडून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे गावातील जवळपास २५ घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
भरपाईची मागणी
दुसरीकडे शेतातील फळबाग उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळं शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

No comments:
Post a Comment