Sunday, April 14, 2024

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी !

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 14 एप्रिल 2024: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 
 नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजात समानता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे, प्रा.यु.एन.फड, जी. व्ही. कांबळे, एम.पी.सातपुते, यु.बी.जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात  आले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिकक्षणत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment