Sunday, April 14, 2024

अंबाजोगाई साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ - चेअरमन रमेश आडसकर

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रा ली कंपनी कडे दिलेला आंबा साखर कारखाना कंपनी चालवण्यास असमर्थ ठरल्या मुळेच पुन्हा आपल्या ताब्यात घेतला असुन कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ असा आत्मविश्वास आडसकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना म्हणजे अंबाजोगाईच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे वैभव असून कै डी एन पाटील यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवण्या साठी सुरू केलेली उत्तम आशी वास्तु आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे हबाडा फेम बाबूरावजी आडसकर यांचे अनेक वर्षे या कारखाण्या वर वर्चस्व राहिले.
मध्यंतरी १०ते १२ वर्ष आंबासाखर स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या ताब्यात होता त्या नंतर पुन्हा कारखाना स्व बाबूरावजी आडसकर यांचे सुपुत्र रमेशराव आडसकर यांच्या ताब्यात आला तो आज तागायत त्यांच्याच ताब्यात आहे.
काही तांत्रिक कारणास्तव आडसकर व त्यांच्या संचालक मंडळाने आंबासाखर कारखाना जुलै २०२१ मध्ये व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रा ली कंपनी ला १५ वर्षा साठी चालवण्यास देण्याचा करार केला. यामुळे ऊस उत्पादक व कामगार वर्गात नाराजीचा सूर निर्माण झाला होता. कंपनी ने हंगाम सन २०२१-२२ व हंगाम सन २०२२-२३ या दोन वर्षाचा उसाचा गळीत हंगाम यशस्वी रित्या पूर्ण केला. सन २०२३-२४ चा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी बाॅयलर प्रदिपन करण्यात आले होते, ट्रक, ट्रॅक्टर ठेकेदार, यांच्या समवेत करार करून पैसे ही देखील देण्यात आले होते,क्रशींग लायसन्स पण मिळाले होते , कंपनीच्या वतीने तयारी सुरू झाली होती मात्र कुठे माशी शिंकली कोण जाने या वर्षीचा गळीत हंगाम सुरू झालाच नाही त्यामुळे पुन्हा ऊस उत्पादकांचा भ्रम निरास झाला.
चालू पंच वार्षिक योजनेत आंबा कारखाना वाचला पाहिजे, या भागातील शेतकरी जगला पाहिजे म्हणून स्व.डी एन पाटील यांचे सुपुत्र व्हाईस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील यांच्या सह सर्व एकत्र आले आणि कारखाना बिन विरोध काढला.
कंपनी कडुन कराराचा भंग झाल्या मुळेच अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी रमेशराव आडसकर, दत्ता पाटील व त्यांच्या टीमने प्रयत्न केले आणि तो परत घेतलाही. कारखाना परत येताच आडसकरानी आंबा कारखान्यावर ठाण मांडून काल दिवस भरात कंपनी च्या नावचे सर्व बोर्ड काढुन टाकून पुन्हा आंबा साखर कारखान्याचे बोर्ड लावले.
आंबा साखर पुन्हा आडसकरांच्या ताब्यात आल्या मुळे ऊस उत्पादक शेतकरी व कामगारा मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन आंबा साखरला गत वैभव प्राप्त करून देऊ असा आत्मविश्वास रमेशराव आडसकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment