Thursday, April 4, 2024

परळीमधील लेंडेवाडीत पाणी टंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)बीड जिल्ह्या तील परळी तालुक्यात असणाऱ्या लेंडेवाडी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थांना पायपीट सुरू आहे. विशेष म्हणजे परिक्षांच्या काळात पाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना देखील भटकावे लागत आहे. 
लेंडेवाडी गावच्या शिवारा शेजारी असलेले अंबलटेक / चांदापूरचे तलाव आटले आहेत. यामुळे गावच्या ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करत आहेत.
प्रशासन या गावच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देत टँकर सुरु करावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास गावातील जनावरांना झाडांना देखील झळा बसतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment