काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे काल (ता. ३ एप्रिल) बीडमधून म्हाळस जवळा या आपल्या गावाकडे जात होते. बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात करुन गाडी थांबवण्याचा इशारा केला. खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला.
तसेच ज्ञानेश्वर खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
No comments:
Post a Comment