बीड जिल्ह्यातील उमापूर येथील दादासाहेब भगवान सांगुळे (वय ३९) व उमाकांत भगवान सांगुळे (वय ४१) हे दोघे भाऊ कामानिमित्त गेवराईला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दुपारी उमापूरकडे परतले होते. दरम्यान बोरी पिंपळगाव येथे समोरून मासे घेऊन येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दादासाहेब सांगुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ उमाकांत सांगुळे गंभीर जखमी झाला आहे.
जखमी रुग्णालयात दाखल
अपघात घडल्यानंतर गावातील नागरिकी मदतीला धावले. सदरच्या अपघातात गंभीर जखमी अवस्थेतील उमाकांतला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
No comments:
Post a Comment