बीडच्या मांजरा धरणाच्या पाण्यावर अनेक शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत आहे. त्याचबरोबर अनेक औद्योगिक वसाहतींना लागणारा पाणी पुरवठा अवलंबून आहे. मांजर धरणात सध्या पुरेसा पाणी साठा आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी जाणवत नाही. मात्र पाणी योजनांची थकीत रक्कम वाढली असून हि रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मांजरा धरणातून पाणी पुरवठा असणाऱ्या २२ पाणी पुरवठा योजनांकडे सुमारे ४७ कोटी ९२ लाख १८ हजार १६१ रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या सर्व पाणी पुरवठा योजनांना पाटबंधारे विभागाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच हि पाणी पट्टी लवकर न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment