आष्टी (प्रतिनिधी) वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा चिखल कालवण्याच्या मशीनमध्ये माती टाकत असताना पदर अडकला.यामुळे गळफास लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील केरूळ येथे घडली. शांताबाई जयदेव जाधव वय 45 वर्ष असं मृत महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जयदेव जाधव हे पत्नी शांताबाईसह मागील दोन वर्षांपासून केरूळ येथे एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत आहेत. दरम्यान आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चिखल तयार करण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना शांताबाई यांचा पदर अचानक मशिनमध्ये अडकला. यामुळे गळ्याभोवती फास बसला या दुर्घटनेत शांताबाई गंभीर जखमी झाल्या. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शांताबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. गेल्या वर्षी देखील अशीच दुर्दैवी घटना या वीट भट्टीवर घडली होती. वाळूज येथील मजुराचा चार वर्षीय मुलगा खेळत असताना अचानक ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला होता.
No comments:
Post a Comment