Sunday, April 14, 2024

रोड रोमिओ च्या सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन पीडीतेची आत्महत्या


केज (प्रतिनिधी) शाळेत जात असताना दोन तरुणांकडून नेहमीच छेडछाड केली जात असल्याने या त्रासाला कंटाळून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर येथे घडली आहे याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

औरंगपुर येथील 14 वर्षीय अल्पवयीन पिडीता ही बनसारोळा येथील आदर्श कन्या विद्यालयात इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकत होती. ती शाळेत जात असतांना तिची कुंबेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे ही दोन मुले नेहमी छेड काढायचे तसेच तिला दुचाकीवरून अडवून त्रास द्यायचे. तर कधी कधी खडे मारून त्रास देत असत. याची तक्रार तिने आपल्या आई-वडिलांकडे केली. पीडीतेच्या चुलत्याने व वडिलांनी ही बाब मुलांच्या आई-वडिलांना भेटून सांगितली.मात्र या मुलांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. पुन्हा दोन महिन्यापूर्वी त्या दोघांनी छेड काढल्याने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते दोघे आमच्या सोबत चल, तू नाही आलीस तर तुझे बघतो अशी धमकी देत होते.मात्र त्यांनी गरिबी परिस्थिती व मुलीच्या इज्जतीपोटी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. 2 एप्रिल रोजी ती परीक्षेला गेली असता त्या दोघांनी आमच्या सोबत चल, नाही तर परीक्षा देऊ देणार नाहीत असा दम दिल्याने तिने घरी येऊन हा प्रकार पुन्हा घरच्यांना सांगितला. मात्र तिच्या वडील व चुलत्याने आम्ही आहोत, तू परीक्षेला जा असे म्हणून परीक्षेला पाठविले. या रोड रोमिओ च्या त्रासामुळे मानसिक तणावात असलेल्या पीडितेने 5 एप्रिल रोजी दुपारी पेपर सुटल्यानंतर घरी येऊन शेतात फवारणीचे मार्शल नावाचे विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 12 एप्रिल रोजी सकाळी सव्वा दहा वाजता हर्षदा हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचे चुलते गणेश दिंगाबर फस्के यांच्या फिर्यादीवरून संकेत राहुल शिंदे, सोमनाथ रघुनाथ डिवरे या दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment