परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील संत श्री रानबा महाराज मंदिर येथे आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता हिंदू धर्मियातील नववर्ष गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संत श्री रानबा महाराज यांची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. यावेळी भाविक भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ येथील पंचायत समिती समोर असलेले संत श्री रानबा महाराज यांचे मंदिर आहे. गुढीपाडवा नववर्षानिमित्त संत श्री रामभाऊ महाराज मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. दिवसभर भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत श्री ज्ञानेश्वर खर्डे ,रामेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे यांनी केले.
यावेळी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल दुबे, गजानन दंदे सर, बालाजी सोळंके, ईश्वर राऊत, बालाजी गर्जे, माऊली आवाड, सुरेश बनसोडे, शेख जावेद भाई, अतुल गडेकर, शिवाजी दंदे, दहिवडे मामा, ज्ञानेश्वर दंदे, ओम खर्डे, काना केंद्रे, अनंत चाटे, शिवाजी फड यांच्या सह भाविक भक्त उपस्थित होते.
No comments:
Post a Comment