Tuesday, April 23, 2024

परळीत अवकाळी पावसाने मोठे नुकसान विद्यानगर भागात विज कोसळली कोणतीही जिवीत हानी नाही.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परळीसह परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरातील ग्रामीण भागात प्रचंड स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतात, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले. तर वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुकानाच्या पाट्या व पत्रे उडाली तर परळी शहरातील विद्यानगर भागात रोहित काटकर यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडून झाडावर पेट घेतला, यात कोणती दुखापत किंवा जीवित हानी झाली नाही.
सदर माहिती तहसीलदार बाबुराव रुपनर साहेब यांनी दिली.

No comments:

Post a Comment