Monday, April 22, 2024

चौदा वर्षीय भोळसर मुलीचे अपहरण गुन्हा दाखल होताच, मुलगी सुखरूप परतली.


गंगाखेड (प्रतिनिधी) : शहरातील केशव नगर दत्त मंदिर परिसरातून काल रात्री बेपत्ता झालेल्या चौदा वर्षीय भोळसर  मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होताच, आज सकाळी ती मुलगी सुखरूप घरी पोहचल्याने नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.

माहितीनुसार, गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या केशव नगरातील चौदा वर्षीय भोळसर मुलगी काल रात्री दहा वाजेच्या सुमारास किराणा दुकानावरून खायला आणते म्हणून बाहेर गेली. ती बराच वेळापर्यंत परत आली नसल्याने, मुलीच्या आई, वडील भाऊ, बहीण व भावजईने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेच मिळून आली नसल्याने, मध्यरात्री  गंगाखेड पोलीस ठाणे गाठून किराणा दुकानावर खायला आणण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय भोळसर मुलीचे कोणीतरी अनोळखी इसमाने अपहरण केल्याची तक्रार दिली.

तेंव्हा रात्र गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नसल्याने अखेर आज सोमवार रोजीच्या पहाटे ४:२८ वाजता अपहत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून अपहत मुलीचे आई, वडील घरी गेल्यानंतर सोमवार रोजीच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास मुलगी सुखरूप घरी परत आल्याने, मुलीच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेत, याची माहिती  पोलीस ठाण्यात दिली.

No comments:

Post a Comment