Wednesday, June 17, 2020

एच.पी.गॅस वाहतुक करणारा टॅंकर पुलावरुन पलटी .टॕकर चालक गंभीर जखमी.

परळी वैजनाथ;-- (प्रतिनीधी) चाकनहुन चंद्रपुरकडे निघालेला एच.पी.गॅस वाहतुक करणारा टॅंकर परळी-सिरसाळा मार्गावरील पांगरी गावाजवळील नदीच्या पुलावरुन पलटी झाल्याची घटना मध्यरात्री घडली,या अपघातात टॅंकर चालक गंभीर जखमी झाला असुन टॅंकरचा चक्काचुर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाकन येथुन घरगुती वापरायचा गॅस भरुन टॅंकर क्र. एम.एच.48 ए.वाय.4895 हा ट्रक घरगुती वापरायचा गॅस भरुन चंद्रपुरकडे निघाला होता.मध्यरात्री एक च्या सुमारास परळी-सिरसाळा मार्गावरील पांगरी येथील वाण नदीच्या पुलाजवळ आला असता चालकास झोप लागल्याने पुलाच्या कठड्यास धडकुन नदीपात्रात पडला यात चालक गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे.या अपघाताचे वृत्त समजताच परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे एएसआय श्रीकांत जाधवर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.

No comments:

Post a Comment