बीड (प्रतिनीधी )ः- बीड जिल्ह्यामध्ये अवैध वाळूचा धंदा जोमाने सुरू आहे.
लपून छपून वाळू तस्कर वाळूची विक्री करत आहे. रात्री वाळू घेवून जाणारा
एक हायवा बीड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतला. या हायवा मध्ये पाच ब्रास
वाळू होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील ही कारवाई शहर वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आली.
एका हायवा द्वारे वाळू जात असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या
पोलीसांना झाल्यानंतर बीड बायपास रोडवर सदरील हायवा क्र.एमएच 23 एयु 2861हा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी चालक नवनाथ शिवाजी हाळनोळ वय- 26 वर्षे, रा.बागपिंपळगांव ता.गेवराई याला ताब्यात घेण्यात आले. या हायवामध्ये पाच ब्रास वाळू होती. वाळूची कसल्याही प्रकारची पावती नव्हती.
चोरट्या मार्गाने वाळू नेली जात होती. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात
कलम 379, 188,269,270 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक हर्षे पोद्दार,अप्पर पोलीस अधिक्षक कबाडे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,
पो.हे.कॉ.भुतके, सारुक,जाधव, गोरे शहर वाहतूक शाखा यांनी केली.
No comments:
Post a Comment