राजूर ;-(प्रतिनीधी ) दिं 26, आज रोजी दगडवाडी,तुपेवाडी,चनेगाव, राजूर व पापळ मध्ये सदर किराणाचे वाटपईस्ट वेस्ट सिड्स कंपनी चे विभागीय व्यवस्थापक दिलीप देशपांडे, शरद सावळे,अरविंद माकोने,श्री पवार,श्री बुरुकुल यांच्यासह तुपेवाडी चे सरपंच रतनकुमार नाईक,तलाठी श्री ठाकूर ग्रामसेवक जगदीश लताड,कृषी सहाय्यक भास्कर ठाकरे, माजी सरपंच एकनाथराव मोरे आणि कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांनी दिली आहे.
कार्ड च्या वतीने गरीब व गरजु कुटुंबाचा सर्व्हे करून अगदी गरीब व गरजू 100 कुटुंबाची निवड करून मजुरी काम करणाऱ्या कुटुंबाना प्रत्येकी 600 रुपये किंमतीची किराणाची किट आज वाटप करण्यात आले आहे.
यात प्रत्येक किराणा किट मध्ये पाच किलो पीठ, एक लिटर तेल,अर्धा किलो तूरडाळ,200 ग्राम मसाले,प्रत्येकी एक किलो मिठ,साखर,डिटर्जंट पावडर,50 ग्राम चहापत्ती,साबण,सॅनिटायझर आदी साहित्य दिले आहे.यामुळे 10 दिवस तरी घराबाहेर कोणी येणार नाही कोरोनाच्या संसर्गाची शिकार होणार नाही.शिवाय आपण दररोज खिचडी सारखे अन्न पदार्थ तयार करून वाटप करणं हे पण आपली जोखीमच आहे. जसे आपण गरजूंना अन्न पोहचवून घास भरवतो त्यातून कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे कळत नाही चुकून आपला बाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास आपण ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. त्यामुळे किराणा सामानच देणं गरजेचं आहे. म्हणून किराणा जीवनावश्यक वस्तू देन्यात आल्या आहेत.अशी माहिती कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांनी दिली आहे. या वाटपासाठी रोहन मगरे,सुनील डोळसे, देविदास राठोड,अर्पणा खरात,माया घोरपडे, भारत दांडगे यांनी परिश्रम घेतले.
धन्यवाद सर
ReplyDeleteरेणुका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद
ReplyDeleteआमच्या कडे पण गरजुवंत आहे आम्हाला काही मदत मिळेल का सर जी