Thursday, June 25, 2020

गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणारे केळवे पोलीस ठाण्याचे एपीआय निलंबित.

पालघर;- (प्रतिनिधी)  कोळंबी प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात चोरलेल्या कोळंबी चोरीचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणारे पालघर तालुक्यातील केळवे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
तालुक्यातील केळवे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलसार व खार्डी येथील कोलंबी प्रकल्पातील कोलंबी मोठ्याप्रमाणावर चोरी झाल्याची व चोरी करणाऱ्यांनी दगडफेक केल्याची प्रकल्प मालक अनंत पाटील व राहुल जगताप यांची तक्रार होती. याबाबत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केळवे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे

No comments:

Post a Comment