बीड : - कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना परळी तालुक्यात मात्र अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ जुगाऱ्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार, १४ जून रोजी सायंकाळी ६.५० वा. च्या सुमारास अंबाजोगाई येथील अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील किनगाव रोडवर असलेल्या शेतात ४ ठिकाणी पत्त्याचा जुगार सुरु असताना पोलिसांनी धाड टाकली. यावेळी नगदी रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईलसह इतर साहित्य असा एकूण १२ लाख ८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment