Monday, June 15, 2020

गेवराईत सलूनच्या दुकानात पाणी घुसून करंट उतरल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू.

 गेवराई ;- (प्रतिनीधी) नुकत्याच झालेल्या पावसात सलुनच्या दुकानात पाणी घुसल्याने या पाण्यात करंट उतरल्याने पाऊस उघडल्यानंतर दुकानात पाय ठेवताच करंटच्या दणक्याने 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 5 च्या सुमारास गेवराई शहरतील ताकडगाव रोडवर घडली. शहरातील ताकडगाव रोडवर दिपक जेंटस पार्लर हे दुकान असून आज दुपारी चार नंतर सुरू झालेल्या पावसात रस्त्यावरील पाणी या दुकानात घुसले होते. दरम्यान पाऊस उघडल्यानंतर दिपक दादाराव छेडदार याने दुकान उघडून आत पाय ठेवताच त्याला विजेचा जोरदार दणका बसल्याने तो खाली कोसळला याबाबत शेजारच्या दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली असता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरील मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात केला आहे. या घटनेबाबत गेवराई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment