Tuesday, June 16, 2020

गढीच्या महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजरचा मनमानी कारभार खात्यात पैसे असतांनाही खातेदारांची अडवणूक.

गेवराई (प्रतिनीधी )ः- सध्या शेतकर्‍यांना बी-बीयाणे भरण्यासाठी पैसे लागतात यासाठीच शेतकर्‍यांनी पै पै जमा करुन बँकेत पैसे ठेवले. मात्र गेवराई तालुक्यातील गढी येथील महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर स्वतःचा मनमानी कारभार हाकत शेतकर्‍यांनी स्वतःच्या खात्यामधून पन्नास हजार ते एक लाखाची मागणी केली तरी विस हजार रुपये हातात टेकतात. ट्रान्सफरही विस हजाराच्या पुढे करत नाही त्यामुळे एखादया शेतकर्‍यांना एक लाख रुपये काढायचे असेल तर पाच दिवस बँकेत चकरा माराव्या लागतात. यामुळे बँकेत मोठी गर्दी होते. शिवाय सकाळी 8 वाजता येणार्‍या लोकांनचा केवळ 60 टोकन वाटले जातात. त्यानंतर तिनशे ते चारशे लोकांना दुसर्‍या दिवशी यावे लागते. या मनमानी कारभारामुळे गढी पंचक्रोशीतील खातेदार वैतागले आहे. 
गढी येथे महाराष्ट्र बँकेची एकमेव शाखा आहे. या शाखेला पंचक्रोशीतील मोठे खातेदार आहे. त्यामुळे रोज चारशे ते पाचशे लोक येथे पैसे काढण्यासाठी भरण्यासाठी यासह अन्य कामकाजासाठी बँकेत येतात. मात्र बँक मॅनेजर सोशल डिस्टन्सच्या नावाखाली सकाळी 8 वाजता रंागेत राहीलेल्या फक्त 60 लोकांना टोकन देतात. त्यानंतर रांगेत राहीलेल्या लोकांना उद्या येण्याचे फर्मान सोडतात. पाच ते सहा तास उपाशी पोटी रांगेत राहूनही केवळ विस हजार रुपये खात्यातून काढण्याची परवानगी देतात. खात्यातून ट्रान्सफरही विस हजारच्यावर करण्यास नकार देतात. बँक मॅनेजरच्या मनमानी कारभारामुळेच एका दिवसात होणारे काम पाच पाच दिवस हेलपाटे मारल्यानंतर होते. त्यावरही छोट्या छोट्या चुकामुळे वृंध्द नागरीकांना अरेरावीची भाषा केली जाते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment