जालना दिं 22 जून, पोट भरण्यासाठी परराज्यातील महाराष्ट्मध्ये आलेल्या,महाराष्ट्रातील मुंबई पुणे ठाणे नाशिक आदी औद्योगिक शहरात गेलेल्या परंतु कोरोना मुळे स्थानिक कंपन्या व इतर कामं बंद पडल्याने आपल्या गावाकडे गांवी महामार्गावरून पायी, सायकल, मोटार सायकल व खाजगी इतर वाहनाने परतत असलेल्या व्यक्तींना कार्ड जालना च्या वतीने मुंबई - नागपूर महामार्ग जालना येथे मोफत भोजन वाटपाची पीपल्स फॉरेन्सिक कॉलेज शेंद्राचे प्रमुख डॉ सुशील सूर्यवंशी यांच्या हस्ते दिं 15 जून रोजी करण्यात आली.मराठवाडा लोक विकास मंच चे अध्यक्ष श्री विश्वनाथअण्णा तोडकर,उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्ट व फइस च्या सहकार्याने करण्यात आली. दररोज किमान 100 व्यक्तींना वाटप करण्यात आले आहे. सतत 8 दिवसामध्ये एकूण 800 व्यक्तींना भोजन वाटप करण्यात आले.
याचा समारोप प्रा डॉ रामदास निहाळ यांच्या हस्ते शेवटचे भोजन स्थलांतरितास देऊन करण्यात आला.यासाठी CARD जालना ची टीम अध्यक्ष प्रा सुवर्णा दांडगे,उपाध्यक्ष प्रा डॉ रामदास निहाळ, पुष्कराज तायडे यांच्यासह स्त्रीशक्ती स्वयं सहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष वंदना दाभाडे, सचिव संगिता जाधव यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले
धन्यवाद सर
ReplyDelete