Wednesday, July 22, 2026

मतदार SIR पूर्ण करा, आपले मतदानाचे हक्क सुरक्षित ठेवा ! - सौ.वर्षा मगर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील सर्व सुजान नागरिकांना आवाहन करण्यात येते की  मतदानाचा अधिकार हा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार आहे. हा अधिकार भविष्यात अबाधित राहावा यासाठी SIR (Special Intensive Revision) अंतर्गत आपली माहिती अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे.
अद्याप अनेक नागरिकांनी SIR प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. वेळेत आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर न केल्यास भविष्यात मतदार यादीबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.
म्हणून आजच SIR पूर्ण करा.
 * आपले कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही SIR करण्यास प्रोत्साहित करा. 
* घरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र मतदाराची नोंद झाली आहे का, याची खात्री करा. 
* कोणतीही शंका असल्यास आपल्या संबंधित BLO किंवा निवडणूक कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.
आजची छोटी कृती उद्याचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवेल.
तरी सर्व जागरूक नागरिकांनी SIR करून घेण्याचे आवाहन कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. वर्षा मगर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment