Wednesday, July 22, 2026

अनंतअप्पा (बाप्पा) जुजगर यांचे निधन पुरुषोत्तम जुजगर यांना पितृशोक

माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव येथील वीरशैव लिंगायत कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिक तथा समाजकार्याबद्दल ओळख असलेले श्री अनंतअप्पा (बाप्पा) जुजगर यांचे आज, मंगळवार दि. २१ जुलै रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.
अनंतअप्पा जुजगर हे परळी उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री पुरुषोत्तम जुजगर यांचे वडील होत. धार्मिक, सामाजिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये ते नेहमी सक्रिय सहभाग घेत असत. अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ व सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव असल्याने ते माजलगाव परिसरात सर्वपरिचित होते. "बाप्पा" या नावाने त्यांची विशेष ओळख होती.
त्यांच्या निधनाने वीरशैव लिंगायत कोष्टी समाजासह माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ तसेच नातवंडे व असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार माजलगाव येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment