Thursday, July 30, 2026

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देते – प्राचार्य प्रा. अतुल दुबे

नीट परीक्षेत ५५१ गुण मिळविणाऱ्या कु. सृष्टी हनुमंत पाळवदे हिचा सत्कार

परळी वैजनाथ | (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, संस्थेच्या सचिव सौ. राजश्रीताई मुंडे तसेच सहसचिव प्रदीप खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अतुल दुबे यांनी केले.
नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थिनी कु. सृष्टी हनुमंत पाळवदे हिने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) २०२६ मध्ये ७२० पैकी ५५१ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा व तिच्या पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य प्रा. अतुल दुबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. ए. ए. मुंडे, प्रा. एस. आर. कापसे, प्रा. ए. डी. शेख, एस. बी. अष्टेकर, व्ही. एन. शिंदे, एस. के. गित्ते, यू. बी. जगताप, ए. पी. जगतकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी उपस्थितांनी कु. सृष्टी पाळवदे हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment