परळी वैजनाथ (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, शाखा नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीने पि. एन. निगळ मुख्याधिकाऱ्यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात चालू महिन्याचे वेतन व थकीत महागाई भत्ता फरकाची रक्कम तातडीने अदा करावी, प्रलंबित धुलाई भत्ता व शिलाई भत्ता वेतनात समाविष्ट करून त्याचा फरक द्यावा, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला तात्काळ ₹१०,००० चे सन अग्रीम देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य (घरकुल) योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी तसेच सन २००५ नंतर लाडे-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थायी आदेश (ऑर्डर) देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात आनंदी वातावरणात साजरी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने नमूद केले असून, वरील सर्व मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्याधिकाऱ्यांकडे पि. एन. निगळ कडे करण्यात आली आहे.
हे निवेदन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर आणि महासचिव विशाल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment